मातृशक्तीच्या अद्वितीय धैर्याला सलाम; बिबट्याला घरातच जेरबंद करून टाळला मोठा अनर्थ!

मातृशक्तीच्या अद्वितीय धैर्याला सलाम; बिबट्याला घरातच जेरबंद करून टाळला मोठा अनर्थ!

📍 संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील श्रीमती गंगूबाई गायकवाड (वय ६५) यांनी दाखवलेल्या अद्वितीय धैर्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. घरात अचानक शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधान राखत त्यांनी घरातच जेरबंद केले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला.

घटना घडली त्यावेळी श्रीमती गंगूबाई गायकवाड या घरात स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला. कोणताही गोंधळ न घालता त्यांनी प्रथम झोपलेल्या मुलाला जागे करून सुरक्षितपणे बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर अत्यंत धाडसाने व प्रसंगाचे भान राखत घराची कडी लावून बिबट्याला घरातच अडकवून ठेवले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. मात्र संपूर्ण परिसरात चर्चा होती ती गंगूबाई गायकवाड यांच्या धैर्य, समयसूचकता आणि शौर्याची.

या धाडसी कृतीबद्दल जलसंपदा मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्रीमती गंगूबाई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार श्री. अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वनविभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमती गंगूबाई गायकवाड यांच्या धैर्याला आणि मातृशक्तीला यावेळी सन्मानपूर्वक वंदन करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *