पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी सुवेंदू अधिकारी

भाजपच्या ऐतिहासिक विजयाने बंगालमध्ये सत्तांतर

कोलकाता | प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडत भाजपने प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली असून भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ९ मे २०२६ रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्याने बंगालच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी विद्यार्थी चळवळीपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९५ मध्ये काँग्रेसकडून पहिली निवडणूक लढवत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्ष संघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

२००७ मधील नंदीग्राम जमीन अधिग्रहण आंदोलनामुळे सुवेंदू अधिकारी राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. २००९ मध्ये खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केल्यानंतर २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.

२०१८ मध्ये परिवहन मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी विविध विकासकामे राबवली. मात्र २०२० मध्ये पक्षांतर्गत मतभेदांमुळे त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करून राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. भवानीपूर मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी पुन्हा विजय मिळवत मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली.

सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये विकास, उद्योग, पायाभूत सुविधा आणि प्रशासनिक सुधारणा यांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *