वडझरी बुद्रुक येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य घोडा–बैल शर्यतीचे आयोजन

वडझरी बुद्रुक येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य घोडा–बैल शर्यतीचे आयोजन

वडझरी बुद्रुक येथे श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य घोडा–बैल शर्यतीचे आयोजन

वडझरी बु//(ता. संगमनेर) येथे बुधवार, दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे भव्य घोडा व बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींचे आयोजन वडझरी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पारंपरिक शर्यती ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक मानल्या जात असून तालुका व जिल्ह्यातील नामांकित घोडे व बैलगाडे या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

यात्रेनिमित्त श्री म्हसोबा महाराजांची पूजा-अर्चा, धार्मिक विधी तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने व शांततेत हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण खेळांचे जतन करणाऱ्या या भव्य घोडा–बैल शर्यतीमुळे वडझरी बुद्रुक गावाचे नाव परिसरात उज्वल होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

— प्रतिनिधी, ज्ञानगंगा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *