संगमनेरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

संगमनेरमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान उत्साहात

संगमनेर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीच्या वतीने संगमनेर शहर व तालुका मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध सत्रांद्वारे कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती व संघटन कौशल्यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराच्या पहिल्या दिवशी पक्षाचा इतिहास, संघटनात्मक बांधणी आणि कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तज्ज्ञ वक्त्यांनी मांडली. डिजिटल माध्यमांचा वापर, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि मतदार नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व यावरही विशेष मार्गदर्शन झाले.

दुसऱ्या दिवशी ‘वृत्त व्यवस्थापन’, ‘मन की बात’ या विषयांवर सत्रे घेण्यात आली. कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे जनसंपर्क कसा वाढवावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण शिबिरात शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या या शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष बळकटीसाठी याचा निश्चितच फायदा होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *