
२ मे हा दिवस म्हणजे समाजाभिमुख कार्यकर्ते शरद गोर्डे पाटील यांचा वाढदिवस. अत्यंत गरीब, शेतकरी-कष्टकरी व दुष्काळी कुटुंबात जन्म झालेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गेल्या तब्बल १७ वर्षांपासून निळवंडे पाट पाण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. या काळात अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषणे करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या लढ्यात अनेक केसेस अंगावर घेतल्या, तरीही ते ठामपणे उभे राहिले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हा लढा त्यांच्या जिद्दीचे प्रतीक आहे.

याचबरोबर तळेगाव पाणी योजनेसाठीचा पाठपुरावा आणि भोजापूर चारी प्रश्नावर केलेली आंदोलने ही त्यांच्या कार्यातील महत्त्वाची पायरी ठरली. स्थानिक पाणीप्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवत लोकांच्या हक्कासाठी भक्कम भूमिका घेतली.

तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीवर काम करत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात घराघरात जाऊन पाहणी केली. सुमारे सव्वा लाख लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुढे या योजनेचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुक्यात परिवर्तन घडून आले, असे मानले जाते.

विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांनी फ्रंटलाईन कोरोना योद्धा म्हणून सलग दोन वर्षे अविरत सेवा दिली. आपल्या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून त्यांनी कोरोना रुग्णांसाठी प्रभावी काम करत, गरिबातल्या गरीब बाधित रुग्णांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवली.

राजकीय व सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय असून, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच, दुष्काळी जनतेच्या पाण्यासाठी केलेल्या मोलाच्या कार्यामुळे ते “दुष्काळी नेता” म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

२०११ ते २०२६ या काळात स्थानिक सत्ताधीशांशी त्यांनी सातत्याने राजकीय संघर्ष केला, आणि राजकारणातील चढ-उतार अत्यंत संयमाने हाताळले. दुष्काळी वडझरी गावच्या उपसरपंच पदापासून ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि थक्क करणारा आहे. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी उभारलेली ही वाटचाल अनेकांसाठी आदर्श ठरली आहे.

संगमनेर तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक ग्रामपंचायत सरपंच, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींपासून ते तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत—शरद गोर्डे पाटील यांची ओळख नसलेले गाव तालुक्यात क्वचितच सापडेल, इतकी त्यांची व्यापक ओळख निर्माण झाली आहे.

पत्रकारिता क्षेत्रात ‘ज्ञानगंगा’ साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले, तर विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांशी घट्ट नाते जोडले.

शरद गोर्डे पाटील यांचा प्रवास हा संघर्षातून घडलेल्या नेतृत्वाचा आदर्श आहे. त्यांची जिद्द, चिकाटी आणि समाजासाठीची बांधिलकी हीच त्यांची खरी ओळख आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

