पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये सोलर हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण; नागरिकांकडून विकासकामांचे स्वागत

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमध्ये सोलर हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण; नागरिकांकडून विकासकामांचे स्वागत

संगमनेर | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आलेल्या सोलर हायमॅक्स दिव्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे शहरातील रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांची प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांनी या विकासकामाचे स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग क्रमांक ११ मधील देवी गल्ली येथे देवीच्या आरतीने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर देवी गल्ली, मालदाड रोड आणि गणेश नगर येथे सोलर हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा सौ. पायल आशिष ताजणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महायुतीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

सोलर हायमॅक्स दिव्यांमुळे परिसर अधिक प्रकाशमान होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही हे दिवे कार्यरत राहत असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे प्रमाण कमी होऊन चोरी, अपघात आणि संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

पाठपुराव्यामुळे उपक्रमाला गती

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, शहराध्यक्षा सौ. पायल आशिष ताजणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा उपक्रम मंजूर करून घेतला. शहरातील विविध भागांमध्ये प्रकाशयोजना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळत आहे.

मान्यवरांचे आभार

यावेळी उपस्थित नागरिकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार अमोलभाऊ खताळ पाटील आणि शहराध्यक्षा सौ. पायल आशिष ताजणे यांचे मनःपूर्वक आभार मानत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे, मूलभूत सुविधांवर भर देणे आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करणे या कार्यपद्धतीमुळे संगमनेरमध्ये विकासकामांना गती मिळत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान “राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा विजय असो” तसेच “भारतीय जनता पार्टी महायुतीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विविध प्रभागांतील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

देवी गल्ली, गणेश नगर आणि मालदाड रोड येथे झालेल्या कार्यक्रमात विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांसह महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल

सामाजिक उत्तरदायित्व, नागरिकांची सुरक्षा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारा सोलर हायमॅक्स दिव्यांचा हा उपक्रम संगमनेर शहराच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी व महायुती संगमनेरच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


– शरद गोर्डे
संपादक, साप्ताहिक ज्ञानगंगा
📞 9623416734 | 9370940491

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *