मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गो-सेवा उपक्रम उत्साहात संपन्न

मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गो-सेवा उपक्रम उत्साहात संपन्न

संगमनेर प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, संगमनेर शहर मंडळाच्या वतीने संगमनेर येथील पांजरपोळ संस्थेत गो-सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आणि जनसेवेचा संदेश देत हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी गोमातांना चारा वाटप करण्यात आले तसेच पांजरपोळ संस्थेच्या कार्यास सहकार्य करून समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाचा गौरव करत राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, शेती विकासासाठी घेतलेले निर्णय, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची उभारणी आणि जनहिताच्या योजनांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास महिला शहराध्यक्ष पायल ताई ताजने,ज्योतीताई भोर, अर्चना पवार, मनीषा वांकेडे, भारत गवळी , दिलीप रावत, शुभम लहामटे, विशाल यमगुंडे, आशिष ताजणे, सुधाकर गुंजाळ, मुकुंद उपरे, कैलास वाघमारे, अमित गुप्ता, श्याम कोळपकर, आकाश सहाणे, लखन सूर्यवंशी, अविनाश पगारे, अरुण डेके, किशोर मांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच भाजप पश्चिम मंडळाचे अशोक ननवरे, संदेश गायकवाड, कैलास डोंगुळे आणि संतोष शिंदे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. उपस्थितांनी गो-सेवा उपक्रमाचे कौतुक करत समाजहितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

यावेळी उपस्थितांनी “गोसेवा हीच संस्कृती, सेवेतून संस्कार आणि संस्कारातून समाजहित” हा संदेश देत सामाजिक कार्याची प्रेरणा दिली. वाढदिवस साजरा करताना केवळ शुभेच्छांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी भविष्यातही सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवून जनसेवेची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

— शरद गोर्डे, संपादक
ज्ञानगंगा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *