खासदार निधीतून १० लाखांचा निधी; साईबाबा मंगल कार्यालय सभामंडप व फिल्टर प्लांट कामाचे वड झरीत भूमिपूजन

खासदार निधीतून १० लाखांचा निधी; साईबाबा मंगल कार्यालय सभामंडप व फिल्टर प्लांट कामाचे वड झरीत भूमिपूजन

गावात सातत्याने विकासाचा आलेख उंचावत असताना त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. माननीय खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या खासदार निधीतून गावासाठी साईबाबा मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकामासाठी ५ लाख रुपये व सुशोभीकरणासाठी ५ लाख रुपये असा एकूण १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ तसेच संपूर्ण गावाला शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बसविण्यात येणाऱ्या फिल्टर प्लांटसाठी जागेचे भूमिपूजन गावच्या सरपंच सौ. संध्याताई संदीप गोर्डे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी गावातील ज्येष्ठ, युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी श्री. शरद गोर्डे, कारभारी गोर्डे व दत्तू गोर्डे यांनी उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सभामंडपासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. विठ्ठल मामा जाधव यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संदीप गोर्डे यांनी केले, तर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार ग्रामसेवक गायकवाड मॅडम यांनी मानले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *