अप्पर तहसिल कार्यालय तळेगाव येथे सुरू करा!
वंचित भागातील ग्रामस्थांची प्रांताकडे मागणी संगमनेर दि.६ प्रतिनिधी अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे,सरपंच घनशाम भाररस्कर महेश उदमले,गोविंद कांदळकर…