भोजापूर पूरचारीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार-ना.विखे पाटील

या भागातील विकसाचे दायित्व स्विकारले,कृती समितीने केला सत्कार

संगमनेर दि.२३ प्रतिनिधी
राज्यात युती सरकार आल्यानंतर निळवंडेचे पाणी दिलेच,पण भोजापूरचेही पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यत देण्याचे महत्वपूर्ण काम करणार काळजी करू नका या भागातील सर्व गावांच्या विकासाचे दायित्व आपण स्विकारले आहे.भोजापूरच्या पूरचारीसाठी निधी उपलब्ध करून देवून शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील सोनुशी येथे नवरात्र उत्सवाच्या निमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास मंत्री विखे पाटील यांनी भेट दिली.तत्पुर्वी लोहारे मिरपूर, कसारे,वडझरी बु, खु आणि तळेगाव येथे ग्रामस्थ कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थांबवून फटाके फोडून  त्यांचे स्वागत केले.निळवंडे आणि भोजापूरचे पाणी सोडण्याच्या निर्णयाची कृतज्ञता म्हणून फटाक्यांची अतिषबाजी आणि फ्लेक्सबोर्ड लावून मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.

सोनुशी येथील कार्यक्रमात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,भोजापूरच्या पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना आंदोलन करावी लागली.यावेळी सुध्दा ही परीस्थिती निर्माण झाली.पण राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शेतकर्यांच्या प्रश्नाला प्राधान्य म्हणून भोजापूरचे पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.या चारीच्या कामातील अडथळे दूर करून शेवटच्या गावाला पाणी पोहचविण्याची जबाबदारी सरकार निश्चित पूर्ण करेल.यासाठी लागणारा निधी लवकर उपलब्ध करून देणयाची ग्वाही त्यांनी दिली.

निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना टंचाईच्या काळात दिलासा देता आले याचे समाधान आहे.निळवंडे धरण आणि कालव्यांच्या कामाबाबत नेहमी विखे कुटूबियांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले मुखापाशी पहील्या बावीस किलो मीटर अंतरावराच कालव्यांची काम सुरू नव्हती.परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ  नेते पिचड साहेब यांच्या पुढाकारने हे काम शक्य झाले.

या भागातील विकासाला नव्या संधी मिळतील.विकासाचे दायित्व आपण स्विकारले आहे.शासनाच्या योजनेतून तळेगाव सोनुशी येथील सभामंडपाला तसेच मालदाड सोनुशी रस्त्याला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला असल्याचे विखे पाटील म्हणाले.वटमाई देवी मंदीराचा समावेश तिर्थक्षेत्र विकास योजनेत करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

नवरात्र उत्सवाच्या निमिताने आदीशक्तीची पूजा आपण करतो.स्त्रीशक्तीमध्ये आपण देवीची रुप पाहातो. स्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी ग्रामस्थांनी आयोजित नवरात्र उत्सव संस्कृती आणि परंपरंचे जतन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल ग्रमास्थांनी केलेल्या या उत्सवाच्या आयोजनाबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.प्रसंगी सुदाम राव सानप, शरद गोर्डे,सरपंच राजेंद्र सानप,भोजापूर कृती समिती कार्यकर्ते सह परिसरातील बहुतांश गावातील सरपंच हजारो लाभधारक व भाविक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *